भारतीय स्त्रीची विविध रूपे!!(bhartiya Streechi vividh roope)

भारतीय स्त्रीचे साधारण वर्गीकरण करायचे ठरविले तर विविध गटात तिचे  विभाजन होईल :पहिली  असते ती नुसतीच गृहिणी!!मुळात हिचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध आलेला नसतो.योग्य(?) वयात लग्न करणे,घर सांभाळणे,पुढे जाऊन मुलं बाळं सांभाळणे,सगळे सणं वार साग्रसंगीत साजरे करणे,आलेल्या गेलेल्यांची काळजी घेणे वगैरे वगैरे हेच तिच्या रोजच्या जीवनातले छोटे छोटे टार्गेट असतात!! आता हिचा नवरा एखाद्या दिवशी म्हणाला,बाई मला आज उशीर होईल ऑफिसातून घरी यायला ,तर हि  त्याला “का?” असंही विचारात नाही.”हो का?बरं”…एवढेच काय ते तिचे उत्तर असेल.ती आणि तिचे घर हे तिचं छोटं विश्व बनून गेलेलं असतं.या चौकटीबाहेर ती कधी विचार करतंच नाही.ती स्त्री पुरुष समानतेच्या वादात अडकत नाही.घरातली कामं हि माझीच जबादारी

Continue reading

Parking @ your own Risk!!!

“पुणे तिथे काय उणे!!”,आता हे झाले खुप जुने!!माझं म्हणणं कट्टर पुणेकरांना,साहजिकच पटणार नाही.अशा पुणेकरांना मी एक खास “ओपन च्यालेंज” देऊ इच्छिते.ह्या लोकांनी मला,पाहिजे त्या वेळी,हवं त्या ठिकाणी,कुठल्याही दिवशी आणि अख्ख्या पुण्यात कुठेही पार्किंगला जागा मिळेलच याची हमी द्यावी.नाही देणार मला माहिती!!साक्षात्‌ देव पण याची हमी देऊ शकणार नाही.अनुभवाचे बोल आहेत हे,असंच नाही म्हणत मी!! आम्ही नवरा बायको एकदा सिनेमा पाहायला गेलो.कुठे म्हणून काय विचारता?अर्थातच,मल्टीप्लेक्स मध्ये!!कधी?साहजिकच,विकेंडला!!आम्ही आय.टी.त असतो ना कामाला!सोमवार ते शुक्रवार ची गुलामगिरी संपवून शनिवार-रविवारचं स्वातंत्र्य उपभोगायला अशा महागड्या ठिकाणीच सिनेमा पहायचा असतो,मॉल मध्येच शॉपिंग करायची असते.त्याशिवाय काय आम्हाला कुणी ऐटीतलं म्हणणार आहे,म्हणजे ,आय.टीतलं म्हणणार आहे? तशी आमच्याकडे दुचाकी,चारचाकी,सगळ्या प्रकारच्या

Continue reading

Blog Post Title

What goes into a blog post? Helpful, industry-specific content that: 1) gives readers a useful takeaway, and 2) shows you’re an industry expert. Use your company’s blog posts to opine on current industry topics, humanize your company, and show how your products and services can help people.