भारतीय स्त्रीची विविध रूपे!!(bhartiya Streechi vividh roope)


भारतीय स्त्रीचे साधारण वर्गीकरण करायचे ठरविले तर विविध गटात तिचे  विभाजन होईल :पहिली  असते ती नुसतीच गृहिणी!!मुळात हिचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध आलेला नसतो.योग्य(?) वयात लग्न करणे,घर सांभाळणे,पुढे जाऊन मुलं बाळं सांभाळणे,सगळे सणं वार साग्रसंगीत साजरे करणे,आलेल्या गेलेल्यांची काळजी घेणे वगैरे वगैरे हेच तिच्या रोजच्या जीवनातले छोटे छोटे टार्गेट असतात!!

आता हिचा नवरा एखाद्या दिवशी म्हणाला,बाई मला आज उशीर होईल ऑफिसातून घरी यायला ,तर हि  त्याला “का?” असंही विचारात नाही.”हो का?बरं”…एवढेच काय ते तिचे उत्तर असेल.ती आणि तिचे घर हे तिचं छोटं विश्व बनून गेलेलं असतं.या चौकटीबाहेर ती कधी विचार करतंच नाही.ती स्त्री पुरुष समानतेच्या वादात अडकत नाही.घरातली कामं हि माझीच जबादारी आहे  ,ती नवऱ्याची नाही हे तिच्या मनात पक्कं बिम्बवलेलं असतं!!म्हणून तिच्या नवऱ्याकडून पण काही विशेष अपेक्षा नसतात.

शिक्षण किमान झालेलं असतं..त्यामुळे ध्येय,उद्दिष्ट,करियर इत्यादी भयंकर गोष्टी तिला माहितीच नसतात.घरच्यांनी जर चुकून परवानगी दिलीच तर घरच्या घरी ती शिवणकाम वगैरे करण्यात समाधान मानते!!माझ्या मते ह्या गटातील स्त्री सर्वात जास्त सुखी असते.

आता दुसरी आहे ती नोकरदार गृहिणी!!माझ्या मते ह्या गटातील स्त्रीचे आयुष्य तिने स्वतःच विनाकारण अवघड करून घेतलेलं असतं!ही नौकरी करून स्वतःच्या पायावर वगैरे उभं राहायच्या दृष्टीकोनातून शिक्षण घेते.तिला स्वतःचा जॉब,ओन हाउस,वेल सेटल्ड होऊन इक्वल इक्वल मॅच चा नवरा हवा असतो..तसा मिळतो पण!!

सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत ती तारेवरची कसरत करण्यात धन्यता मानते..बरं हे सगळं ती एकटीच करते असं नाही तर इथे नवऱ्याकडून पण तेवढ्याच अपेक्षा असतात.सकाळी डब्बाच भर,पोरांना शाळेतच सोड,वाशिंग मशीन ला कपडेच लाव इत्यादी इत्यादी!!ह्यात गैर काहीच नाही पण बऱ्याच वेळेस “मी पण नौकरी करते ना,तुझ्या इतकीच दमते ना!!मग तू पण घरातली जबाबदारी माझ्या बरोबरीने घेतलीच पाहिजे ” ही गरज कमी आणि अट्टाहास जास्त होऊन बसतो!!

एखाद्या दिवशी जर हिच्या नवऱ्याला उशीर होणार असेल घरी यायला तर “मी उशिरा येईन बरं”,असं म्हणून तो सुटू शकत नाही!!कध्धीच नाही!!

प्र,१..का उशीर होणार आहे?

ऊ:मीटिंग आहे..अचानक आली!!(इथे मीटिंग म्हणल्यावर पुढचे बरेचसे धोके आपोआप टळतात..ऑफिस ची पार्टी बिर्टी म्हणला तर गेलाच बिच्चारा!! असो तो विषय वेगळा!!)

प्र२:आता चिनू ला डे केर मधून कोण आणणार?ती ड्युटी तुझी आहे ना रोजची?आणि तू मला आत्ता सांगतोयस?मी एकटी काय काय करू?(उत्तराची अपेक्षा करू नका..इथून पुढे फक्त प्रश्न आणि प्रश्नच!!)मला पण दहा गोष्टी मॅनेज कराव्या लागतात ऑफिसमध्ये,लवकर निघायचं असेल तर!!आता काय सांगू मी माझ्या बॉस ला?आणि आज रात्री आपल्याला मिनूच्या प्रोजेक्टसाठी नवीन आईडियास घ्यायच्या होत्या नेट वरून!!ते पण मीच एकटी करू का??तुझं हे नेहमीचंच झालंय!!ठेव आता फोन..करते काहीतरी adjust!!

 

असा त्रागा ती नेहमीच करून घेत असते!!ही मुलांना पाळणाघरात तर सोडते पण मनात कुठेतरी एक guilt घेऊन वावरत असते!!नौकरी करायची असते,तिथे पण चांगली कामगिरी करायची असते,घरची पण जबाबदारी चोखरित्या पार पाडून सगळ्यांची शब्बासकी मिळवायची असते!!मुलांकडे पण दुर्लक्ष करायचं नसतं.आणि सगळ्या जबाबदाऱ्या अगदी उत्तम रित्या पार पाडून ती “SUPERWOMAN” बनते तर खरी…पण ती किती सुखी असते यात नक्कीच संभ्रम आहे!!

 

तिसरी आणि शेवटची आहे ती सुशिक्षित बेरोजगार गृहिणी!!!हिच्या आयुष्यातले सुरुवातीचे काही टप्पे आपल्या नौकरदार गृहीणीप्रमाणेच असतात.पण काही कारणास्तव(मुल होणे,नवऱ्याची बदली,घरातील इतर प्रश्न)हिला नौकरी सोडून सामान्य गृहिणीचे जीवन जगावे लागते आणि हिचा खरा struggle तेव्हा चालू होतो!! आता मनात असा विचार येईल त्यात काय अवघड आहे!!गृहिणी तर गृहिणी..काय फरक पडतो!!पडतो…महाभयंकर फरक पडतो!!

पहिली गोष्ट तर हिला गृहिणी म्हणलेलं आवडत नाही!!ह्यांच्यासाठी एक गोंडस नाव आहे “home maker” म्हणे!!हिला कधी कशाचा राग येईल.कधी हिचा ईगो हर्ट होईल काही सांगता येत नाही!!

आता नवरा जर म्हणला “आज मला उशीर होईल घरी यायला”.ही त्याला काही २ ४ प्रश्न विचारून त्याला आठवण करून देते कि मी पण नौकरी केलेली आहे बरं का!!उशीर वगैरे होऊ शकतो हे मी समजून घेऊ शकते!!पण मनातल्या मनात धुमसत असते..मी आता नौकरी करत नाही ना,त्यामुळे मला काही किंमतच नाही!!मला काय काम आहे न दुसरं ह्याची वाट पाहत बसण्याशिवाय!!उगाचच,विनाकारण तडफड करून घ्यायची!!त्या नवऱ्याच्या मनाला असले विचार शिऊन पण गेलेले नसतात पण ही मात्र दोन्ही बाजूंनी स्वतःच तर्क काढून मोकळी होते!!

कधी चुकून काही कारणामुळे हिला नवरा म्हणाला “अगं तू कर ना हे अमुक तमुक काम!!नाहीतरी घरीच बसून असतेस!!”हे बोलून नवरे मंडळी तिसऱ्या महायुद्धाला आमंत्रण देत आहेत ह्याची जाणीव फार उशिरा होते बापड्यांना!!

“म्हणजे म्हणायचंय काय तुला?मी काहीच काम करत नाही का?घरात काय झोपा काढत असते का?मी एके काळी नौकरी करायचे हे विसरलास वाटतं आणि घर पण तितकंच व्यवस्थित सांभाळल आहे!!मी घरात म्हणजे मी रिकामी आणि तू बाहेर जातोस तर तू खूप busy का???आणि मला पण काही घरी बसायची हौस नव्हती!!तुझ्यामुळेच सोडली नौकरी मी!!इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे !!!!

हिला नेहमी एकच भीती सतावत असते,मी एक हुशार,कर्तबगार स्त्रीपासून एक साधी गृहिणी तर होऊन बसणार नाही ना!!माझी ओळख सगळे विसरतील का?ह्या एकाच असुराक्षिततेमध्ये ती नेहमी वावरत असते.आणि ह्याच असुराक्षिततेमध्ये ती स्वतःला नेहमीच सिद्ध करण्याच्या धडपडीत असते..social media वर जास्त active असते,सगळ्यांना आठवण करून द्यायला कि मी घरी असले तरी माझा बाहेरच्या जगाशी touch सुटलेला नाही!!मी आणखी पण तितकीच सजग आहे आणि टिपिकल हाउसवाईफ नाही झालेले!!किंवा मग घरी बसून पण मी माझ्या ज्ञानाचा किती चांगला उपयोग करते आहे हे दाखवण्यासाठी ती blog लिहायला चालू करते!!!

Posted in: abc

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *