Parking @ your own Risk!!!

“पुणे तिथे काय उणे!!”,आता हे झाले खुप जुने!!माझं म्हणणं कट्टर पुणेकरांना,साहजिकच पटणार नाही.अशा पुणेकरांना मी एक खास “ओपन च्यालेंज” देऊ इच्छिते.ह्या लोकांनी मला,पाहिजे त्या वेळी,हवं त्या ठिकाणी,कुठल्याही दिवशी आणि अख्ख्या पुण्यात कुठेही पार्किंगला जागा मिळेलच याची हमी द्यावी.नाही देणार मला माहिती!!साक्षात्‌ देव पण याची हमी देऊ शकणार नाही.अनुभवाचे बोल आहेत हे,असंच नाही म्हणत मी!! आम्ही नवरा बायको एकदा सिनेमा पाहायला गेलो.कुठे म्हणून काय विचारता?अर्थातच,मल्टीप्लेक्स मध्ये!!कधी?साहजिकच,विकेंडला!!आम्ही आय.टी.त असतो ना कामाला!सोमवार ते शुक्रवार ची गुलामगिरी संपवून शनिवार-रविवारचं स्वातंत्र्य उपभोगायला अशा महागड्या ठिकाणीच सिनेमा पहायचा असतो,मॉल मध्येच शॉपिंग करायची असते.त्याशिवाय काय आम्हाला कुणी ऐटीतलं म्हणणार आहे,म्हणजे ,आय.टीतलं म्हणणार आहे? तशी आमच्याकडे दुचाकी,चारचाकी,सगळ्या प्रकारच्या

Continue reading